विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
इंदापूर :- ( जि. पुणे ) बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने इंदापूर विधानसभेची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 16/ 7 /2023 रोजी शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी पार पडली .
या बैठकीला प्रदेशचे सचिव इंदापूर विधानसभा इन्चार्ज अजितजी ठोकळे तसेच प्रदेश सचिव शितलताई गायकवाड जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड जिल्हा प्रभारी महंमद शफी साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले .
यावेळी प्रदेश सचिव अजितजी ठोकळे यांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले , महाराष्ट्र सरकार हे एक खिचडी सरकार असून महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्वच पक्षांनी सत्ता भोगली असताना जनतेची गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही कामे झाली नाहीत. कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलणारे आमदार खासदार हे स्वतःसाठी निवडून आले की जनतेसाठी हाच प्रमुख प्रश्न महाराष्ट्रीय जनतेला पडला आहे .
फुले ,शाहू , आंबेडकरांचे नाव घेऊन स्वतःला पुरोगामी म्हणणारे पक्षाचे नेते मनुवादी पक्षाच्या दावणीला स्वतःच्या स्वार्थ साठी बांधले गेले आहेत . जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी जनतेची चक्क फसवणूक केली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. देशात वाढलेली महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी हे रोखण्यात बीजेपी सरकार अयशस्वी झाले असून आमदार खासदारांची खरेदी-विक्री करून देशातील प्रादेशिक पक्ष संपवून या देशांमध्ये हुकूमशाही आणण्याचा डाव बीजेपी सरकारने आखला आहे. पण देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेला राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टी हा बीजेपीला कधीही त्यांच्या उद्देश सफल होऊ देणार नाही .
पुढे ते म्हणाले ,आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बहुजन समाज पार्टी विधानसभेतील सर्वच्या सर्व जागा मोठ्या ताकतीने स्वबळावरती लढणार असल्याचे सांगण्यात आले . त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन बांधण्यासाठी व निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी विधानसभेचे प्रभारी विशाल घाडगे कोषाध्यक्ष आनंद फडतरे , ॲड . समीरण पोळ , दत्तात्रय मिसाळ , मिलिंद मिसाळ , सुमित मिसाळ , मा. प्रदीप पोळ, अनिकेत मिसाळ , बापूराव घाडगे ,असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा