Breaking News

२१ जुलै २०२३

प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाला यश...


 मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे


मंगळवेढा तालुक्यातील लवंगी व बोराळे या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये  शिक्षक कमी असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी आंदोलन करण्यात आले. मात्र गटशिक्षणाधिकारी यांच्या आश्वासनानंतर देखील शिक्षक उपस्थित न झाल्याने आज रोजी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील व शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  धरणे आंदोलन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी लवटे सर यांनी आंदोलनाची दखल घेत तात्काळ लवंगी व बोराळे येथे तीन- तीन शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले, गेजगे साहेबांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी लवंगीचे पालक जयसिंग जाधव यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेत 15 महिन्या पासून कायम स्वरूपी शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे, अक्षरशा 5 वी च्या काही मुलांना मराठी वाचता येत नाही लिहता येत नाही तर आमच्या मुलांचे भविष्य काय. बोराळे चे गावकरे व कुमार स्वामी यांनी एक शिक्षक गैरहजर राहीले तर एक शिक्षक 98 विद्यार्थ्यांना सांभाळू शकतील का त्यामुळे अजून एक शिक्षक तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली. प्रहार चे कार्याध्यक्ष  अमोगसिद्ध काकणकी यांनी पट संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी यांनी तात्पुरते शिक्षक नियुक्त करावेत.सारिका कवचाळे यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत येणारी मुले ही गरीब,कष्टकरी शेतकरी कुटूंबातुन येत असतात त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे तरच ते आपल्या कुटुंबाचा उद्धार करु शकतील.

राजकुमार स्वामी  यांनी जो पर्यत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे. याचे तात्काळ नियोजन करावे.याच बरोबर प्रहार जनशक्ती पक्ष कायम सर्वसामान्यां बरोबर असणार आहे. कोणाचीही काही अडचण असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रहार चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत तालुका संपर्क प्रमुख तानाजी माने,तालुका संघटक अजित टकले,महिला प्रमुख सारिका कवचाळे उपाध्यक्ष प्रकाश मेटकरी, चेतन वाघमोडे, विभाग प्रमुख नवनाथ शिरशटकर,संपर्क प्रमुख महेश तळ्ळे, महम्मद ढालाईत,पोपट कोळी,पकु करगोडे,शरद चव्हाण, सिद्धु काकणकी, मल्लु तळ्ळे, राकेश कपले,प्रज्वल मलकारी,अल्लाउद्दीन अन्सारी, सुभाष मुलानी, काशिनाथ मळगे, शेलु पाटील आपाराया काकणकी,शिवाजी ढावरे,सागर चव्हाण, सिद्धु मेटकरी, बाबासाहेब ढावरे,अनिल मेटकरी,बाबा इनामदार,शिवा गावकरे, कुमार स्वामी,नवनाथ साळुंखे, शिवा नकाते, राजकुमार स्वामी तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा