Breaking News

२० एप्रिल २०२३

इंदापुर तालुका सामाजिक न्याय विभागाची कार्यकारणीची बैठक सागर बाबा मिसाळ यांच्या उपस्थित यशस्वीरित्या पार पडली गेली...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

  अंथुर्णे :- ( ता. इंदापूर ) इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यात आली होती. इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी ,ज्येष्ठ नेते,कार्यकर्ते सदस्य अंथूर्णे पी डी सी बँक सभागृह येथे सामाजिक न्याय विभाग इंदापूर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंग साठी सामजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष जयदीप जी गायकवाड  सामाजिक न्याय राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पंडितजी कांबळे सामजिक न्याय राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष विक्की लोखंडे जी तसेच इंदापूर तालुकाध्यक्ष सागर बाबा मिसाळ आणि तालुक्यातील पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, यांच्या उपस्थितीत विविध पदांचे वाटप करण्यात आले. कार्यकारिणीमध्ये 70 पेक्षा जास्त पदेही देण्यात आली. 

यावेळी सागर बाबा यांनी सांगितले की इंदापूर तालुक्यातील तळागाळातील समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका हे एक सामाजिक न्याय विभागासाठी एक नंबरचे मॉडेल असेल. राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करून आणि लोकांचे कामे करून आम्ही लोकांना अगदी योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ. त्यासाठी आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन आणि समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र करून न्याय मिळवून देऊ .सामाजिक न्याय राष्ट्रवादी इंदापूर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य व सर्व राष्ट्रवादीचे  पदाधिकारी कार्यकर्ते,सदस्य यांची मीटिंग अतिशय मोठ्या प्रमाणे कार्यकर्त्यांची उत्सुकता व प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम अतिशय छान आणि सुरेख पद्धतीने पार पडला गेला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचे सागर बाबा मिसाळ यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा