Breaking News

भीमा नदीत सापडला ३० किलो वजनाचा सिल्वर जातीचा मासा...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

इंदापूर :-  पिंपरी बुद्रुक  (ता. इंदापूर) 

 येथील मच्छिमार कृष्णा बाळासाहेब रजपूत यांना भीमा नदी पात्रात 

 मासेमारी करताना तब्बल 30 किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा सापडला.


इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मासळी बाजारात या माशाची दत्तात्रय व्यवहारे यांच्या तेजश्री फिश मार्केटमध्ये लिलाव पध्दतीने विक्री करण्यात आली. १८० रुपये किलो दराने याची विक्री झाली. साडेपाच हजार रुपये उत्पन्न यातून मच्छीमाराला मिळाले आहे.


कृष्णा बाळासाहेब रजपूत हे गेली पाच ते सात वर्षांपासून मच्छीमारी व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी ते मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यासाठी गेले. त्यावेळी सोमवारी त्या जाळ्यात त्यांना तब्बल ३० किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा मिळून आला. मासेमारी करत असल्यापासून पहिल्यांदाच एवढा मोठा मासा मिळाल्याचे त्याने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत