Breaking News

०७ मार्च २०२३

फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

इंदापूर :-  ( जि. पुणे ) फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.

यावेळी राज्य मार्गदर्शक पदी युवराज मस्के यांची नियुक्ती  जाहिर करण्यात आली.तसेच कायदेशिर सल्लागार पदी ॲड.नितिन राजगुरू, राज्य मार्गदर्शक पदी दिपक उर्फ बाबासाहेब भोंग,इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी श्रीमती छायाताई पडसळकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

 वरील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना दि. 5 मार्च 2023 रोजी इंदापूर येथे फुले प्रहार चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी फुले प्रहार चे संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत बोराटे, ॲड.समिर टिळेकर,माळवाडीचे माजी सरपंच नागनाथ  व्यवहारे,सामाजिक कार्यकर्ते पोपटराव धवडे,फुले प्रहार प्रदेश कार्याध्यक्ष गणेश जाधव,पश्चिंम महाराष्ट्र अध्यक्ष बापू बोराटे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र म्हेत्रे,पश्चिंम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक देवकर,पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नेवसे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय राऊत,इंदापूर तालुकाध्यक्ष बबनराव खराडे, बारामती शहराध्यक्ष दादासाहेब गोरे,बारामती शहर युवकाध्यक्ष विकास म्हेत्रे,बारामती शहर युवक उपाध्यक्ष सुयोग गायकवाड,इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा