Breaking News
०६ मार्च २०२३
पोलीस पाटील प्रशांत गडहिरे यांना पदावरून हटवावे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गडहिरे यांची मागणी...
सांगोला- वाणीचिंचाळे गावाचे पोलीस पाटील हे आपल्या पदाचा दुरूपयोग करून सर्वसामान्य लोकांना त्रास देत आहेत. तसेच गावातील लोकांना मी पोलीस पाटील आहे म्हणून धमकी देत आहेत. तसेच गावात सावकारी करण्याचा प्रकार राजरोसपणे करत आहेत. तसेच गावात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असताना जाणीवपूर्वक शांतता बिघडवण्याचे कामच चक्क पोलीस पाटील करत आहेत. यामुळे गावातील लोकात दहशत निर्माण झाली आहे.तसेच गावातील लोकांकडून इ पिक करण्यासाठी 100ते 200रू उकळून त्यांची फसवणूक करत आहेत. याविषयी तलाठी यांना विचारले असता अश्या प्रकारे कोणतेही पैसे घेण्याचे आदेश नसल्याचे सांगितले. यामुळे सदर पोलीस पाटील प्रशांत गडहिरे आपल्या पदाचा दुरूपयोग करून गोरगरीब लोकांना लुबाडत आहे.त्यांच्या कामाविषयी वरीष्टही नाराज आहेत .त्यांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे गावातील किरकोळ तंटे गावात मिटत असताही ते आपल्या पदाचा गैरवापर करून ते तंटे पोलीस स्टेशनला नोंद करायला लावतात. गावात पोलीस पाटील हे आपल्या वेगवेगळ्या कामामुळे कायम वादग्रस्त भुमिका घेऊन गावात अशांतता निर्माण करत आहेत. यामुळे सदर पोलीस यांना कामावरून कमी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेत ठराव करण्यात आला आहे. अशा चुकीचे काम करणाऱ्या पोलीस पाटील प्रशांत गडहिरे यांना कामावरून कमी करुन गावाला पुन्हा तंटामुक्त गाव बनविण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलावे असे निवेदन शशिकांत गडहिरे ग्रा.सदस्य यांनी दिले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा