प्रतिनिधी - संतोष कदम.
गंगापूर- वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पक्ष बांधणी संदर्भात आढावा घेण्यासाठी १० मार्च पासून त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दौरा करणार आहेत त्यांचा दौरा १० मार्च सकाळी ९ वाजता गंगापूर येथुन त्यांनी दौरा सुरू केला. गंगापूर येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या गंगापूर तालुका पदाधिकारी, तालुका महिला पदाधिकारी, तालुका युवक पदाधिकारी, यांच्या कडून संघटनात्मक आढावा अरुंधती ताई शिरसाट यांनी घेतला .
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा महासचिव अँड पंकज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव शाम भारसाकळे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, जिल्हा संघटक प्रविण म्हस्के, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते,सईद बाबा पठाण , संतोष जाधव,कान्हु भालेराव, अँड सुशीलकुमार शिराळे,शांतावन उबाळे, अमृतराव डोगरदिवे, रांजणगाव शे पू शहराध्यक्ष शेख हनीफ पटेल, आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा