अजनाळे:प्रतिनिधी
चिनके गावच्या सौ सविता रामहरी मिसाळ यांनी सन 2022 मध्ये सांगोला तालुक्यातून प्रथमच एकाच वर्षात दोनदा MDRT पुरस्कार मिळवून चिनके गावचे नाव स्वतः बरोबर जागतिक विमा क्षेत्रात नेऊन अग्रगण्य केले
त्यांनी सतत सलग 3 ऱ्या वर्षी MDRT जागतिक दर्जाचा विमा क्षेत्राचा अत्यंत मानाचा बहुमान प्राप्त केला सन2022 मध्ये त्यांनी MDRT पुरस्कार एकाच वर्षात दोनदा मिळवुन आपल्या नावाची नोंद जागतिक विमा क्षेत्रात केली आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन सर्व सांगोला तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यातून सर्वत्र होत आहे
त्यांची विमा एजन्सी 13 वर्षापासून अविरत चालू आहे त्यांचेकडे LIC ची चेअरमन क्लब मेम्बरशीप आहे लवकरच त्यांना GALAXY CLUB मेम्बरशीप मिळणार आहे
परमार्थातून स्वार्थ जगतगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे व्यवसाय चालू आहे समाजामध्ये सर्वात कठीण काम कोणते असेल तर एखाद्या व्यक्तीला बचत करायला लावणे पुढील काळासाठी त्याचे व कुटुंबाचे आर्थिक नियोजन करून देणे
या सर्व गोष्टी सौ मिसाळ या आपल्या चिनके येथील स्वताच्या सुसज्ज ऑफिस मधून करून देतात
या त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे
इतर तालुक्यातून सुद्धा ग्राहकांचा ओढा विमाप्रनिधी सौ सविता मिसाळ यांच्याकडे आहे स्वतः विक्री केलेल्या विमा पोलिसी सह त्यांनी न केलेल्या म्हणजेच इतर विमा प्रतिनिधी नि विक्री केलेल्या विमा पोलिसी ला सुद्धा सेवा देतात
======================================
======================================
LIC OF INDIA च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत मनी बॅक पोलिसी चे गेल्या वर्षी 2021/22 मध्ये रु 25 लाख परतावा दिला मॅच्युरिटी म्हणजे मुदती अंती विमेदारांना रु 55 लाख परतावा दिला मृत्यूदावा म्हणजे अकस्मात घडलेल्या घटनेनंतर त्या विमैदारांच्या वारसाला सन 2021/22 मध्ये रु 11 लाख परतावा मिळवून दिला
या कामी त्यांना पंढरपूर शाखेचे शाखाअधिकारी श्री डोईफोडे साहेब , पंढरपूर व सांगोला शाखेतील सर्व अधिकारी वर्ग ,कर्मचारी वर्ग व विशेष सहाय्य त्यांचे सिनिअर बिझनेस असोसिएट विकास अधिकारी श्री मिलिंद वंजारी साहेब यांचे मिळाले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेषतः सर्व विमेधारकांचे आभार व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा