Breaking News
१७ जानेवारी २०२३
पायोनियर स्कूल य मंगेवाडी मध्ये मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साह संपन्न...
पायोनियर स्कूल य मंगेवाडी मध्ये मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न... अजनाळे: दि १७ जानेवारी रोजी पायोनियर स्कूल पायोनियर इंग्लिश स्कूल व पायोनियर गुरुकुल मध्ये मकर संक्रातीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रशिलातील शिशुवर्ग ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे माता पालकांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिवा सौ मनीषा अनिल येलपले मॅडम उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सौ नेहाताई साळुंखे पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमांचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीमती राऊत मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व उपस्थित स्त्रियांना वान देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यास नेहा ताई मॅडम यांनी उपस्थित महिलांना भारतीय संस्कृती व स्त्रियांच्या समस्या याविषयी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला एक कार्यक्रमांमध्ये उपस्थित महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले म्युझिक चेअर या खेळामध्ये सौ प्रिया संभाजी बाबर या विजयी झाल्या सेव बोलुन या खेळामध्ये सौ प्रियंका संदीप कंड्रे या विजयी ठरल्या विजेत्या महिलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी माता पालकांनी अतिशय उत्कृष्ट सहभाग नोंदवाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली तारळेकर मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन सो वैशाली येलपले मॅडम यांनी केले...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा