श्री वर्धमान विद्यालयामध्ये प्राचार्य पदी चंद्रकांत कांबळे सर यांची निवड झाल्याबद्दल महात्मा फुले कॉलनी वरील नागरिकांच्या वतीने सत्कार संपन्न...
प्रतिनिधी - संतोष कदम.
अंथुर्णे :- ( ता. इंदापूर ) वालचंद नगर परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेले श्री वर्धमान विद्यालय होय, या विद्यालयांमध्ये महात्मा फुले कॉलनी ( उखळमाळ ) येथील भूमीपुत्र असलेले चंद्रकांत मारुती कांबळे सर यांची नुकतीच प्राचार्य पदी निवड झाली त्याबद्दल राजगृह बुद्ध विहार समिती व कॉलनी वरील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार, गौरव करण्यात आला.
यावेळी वालचंद विद्यालय कळंबचे प्राचार्य बी.के. सर्वगोड सर, शेलार सर, दिलीप लोंढे सर, वंचित बहुजन पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार, वंचित जिल्हा संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, सुजय रणदिवे, पत्रकार संतोष कदम, ग्रा.पं. माजी उपसरपंच संजय वंचाळे, संतोष कांबळे, सुनील केंगार, संजय धिमधिमे, आण्णा ओव्हाळ, अतुल बनसोडे, दत्ता काटे, स्वप्निल धिमधीमे, विकास खरात, अविनाश अहिवळे, मधु तोरणे आदी उपस्थित होते.
तसेच वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार व त्यांची टीम यांच्या वतीने प्राचार्य पदी निवड झालेले चंद्रकांत कांबळे सर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत