अभिनव पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न; कनेरी मठ, शाहू पॅलेस व रंकाळा तलावला दिली भेट..
अजनाळे:सांगोला गौरव न्यूज: अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे ची शैक्षणिक सहल उत्साही वातावरणात कोल्हापूर मधील कनेरी मठ,शाहू पॅलेस व रंकाळा तलाव या ठिकाणांना भेट व निरीक्षणाने संपन्न झाली.
इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी सहलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सकाळी 6.30 वाजता सर्व विद्यार्थी व शिक्षकांसोबत सहलीला सुरुवात झाली. प्रवासामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी डान्स व गाणी यांचा मनमुराद आनंद लुटला. कनेरी मठ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून व तेथील देखाव्यांच्या माध्यमातून पारंपारिक व आधुनिक समाज जीवनातील तफावती विषयी माहिती मिळवली.कणेरी मठ या ठिकाणचा मायामहल हा विद्यार्थ्यांना आश्चर्यजनक वाटला. शाहू पॅलेसला भेट देऊन विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील वस्तू,त्यांनी वापरलेली हत्यारे, त्यांचा दरबार तसेच त्यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवली. सायंकाळच्या वेळी नयनरम्य दिसणाऱ्या रंकाळा तलावाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या पदार्थांचा आनंद लुटला.
शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांचे उत्कृष्टरित्या मनोरंजन झाले,तसेच त्यांच्या ज्ञानातही भर पडली.सहलीच्या आयोजनाबद्दल पालकांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत