राहुरी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये पैलवान प्रणित नागेश सरवदे यांचे घवघवित यश...
प्रतिनिधी - संतोष कदम.
नीरा नरसिंहपूर : (ता. इंदापूर) येथील चिरंजीव प्रणित नागेश सरवदे यांनी राहुरी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये 86 किलो वजन वजन गटांमध्ये दुसरा क्रमांक संपादन केला आहे. प्रणित सरवदे हे सह्याद्री एग्रीकल्चर कॉलेज यशवंत नगर कराड या येथे शिकत असून एम पी के व्ही राहुरी युनिव्हर्सिटी मार्फत 86 वजनी गटामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला असून आता त्यांची निवड ऑल इंडिया साठी झाली आहे. सह्याद्री कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर कराड यांच्यातर्फे तसेच पिलीव आणि नरसिंहपूर गावामध्ये त्यांना सन्मान पदक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले आहे.
पिलीव गावचे प्रसिद्ध उद्योगपती व प्रणित कन्स्ट्रक्शनचे मालक श्री. उमेश सरवदे यांचे ते पुतणे आहेत आणि निरा नरसिंहपुर गावचे प्रसिद्ध उद्योगपती व सरपंच प्रतिनिधी विजय सरवदे यांचे ते पुतणे आहेत तसेच निरा नरसिंहपुर चे सुप्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांचे प्रणित सरवदे हे छोटे बंधू आहेत. पैलवान प्रणित सरवदे यांना इंदापूर तालुका तसेच माळशिरस तालुका आणि महाराष्ट्रातून सर्व जनतेतून शुभेच्छा मिळत आहेत त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत