पायोनियरची वाघीण प्रतीक्षा येलपले गोळा फेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व पल्लवी येलपले हिने जिल्ह्यामध्ये पटकावला चौथा क्रमांक...
अजनाळे:सचिन धांडोरे: 20 डिसेंबर शालेय शिक्षण क्रीडा विभाग अंतर्गत सन 2022 - 23 आयोजित जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेमध्ये पायोनियर स्कूल यलमर मंगेवाडीने घवघवीत यश संपादन करून स्कूलचे नाव उज्वल केले आहे. यामध्ये पायोनियर स्कुलची कु प्रतीक्षा दत्तात्रय येलपले ही १७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला तिच्या या यशामागे शाळा व तिचे पालक श्री दत्तात्रय येलपले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर १४ वर्ष वयोगटाखालील गोळा फेक स्पर्धेमध्ये पल्लवी या विद्यार्थिनींनी जिल्ह्यामध्ये चौथा क्रमांक पटकावून पायोनियर स्कूलचे नाव जिल्ह्यामध्ये उज्वल केले आहे तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर, सरपंच बापु जाविर यांच्यासह क्रीडा शिक्षक घाडगे सर, ग्रामस्थ, शिक्षक शिक्षक इत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत