Breaking News

वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब मधील खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्न...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

कळंब :- ( ता. इंदापूर ) न्यु इंग्लिश निमगाव ता. खेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षे वयोगट व 19 वर्षे वयोगट या दोन्ही गटातील विद्यार्थी खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच संभाजी विद्यालय बोरी ता. जुन्नर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब मधील खालील विद्यार्थी यांनी आपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे व त्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१) रोहित संजय अर्जुन  -  इ. १० वी.

२)  तानाजी मारुती घोरपडे -  इ.१२ वी.

३)  अंकुश कृष्णा देवकाते  - इ.१२ वी.

४)  कु. काजल देविदास जाधव - इ. ११ वी.

वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब चे अध्यक्ष  मा. रामचंद्र कदम साहेब, उपाध्यक्ष मधुकर जी पाटील सो, सचिव मा. सुर्यभान मोहिते तसेच संस्था पदाधिकारी , विद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड बी.के, पर्यवेक्षक माळवदकर आर.एस, माझी क्रीडा शिक्षक अर्जुन शेलार सर, जुनियर प्रमुख सावंत सर, ज्येष्ठ शिक्षक अर्जुन सर, मेजर नवनाथ अर्जुन, ग्रामस्थ नितीन जानकर, मार्गदर्शक शिक्षक काळे सर, ठोंबरे सर, शेख सर, व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी हार्दिक अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत