बाल नाट्य स्पर्धेत अभिनव पब्लिक स्कूलला तिहेरी मुकुट..
अजनाळे: बुधवार दि. 28 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र कामगार मंडळ आयोजित सांगली येथे पार पडलेल्या बालनाट्य स्पर्धेत अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे ने आपल्या कलागुणांचा अविष्कार दाखवत तिहेरी मुकुट संपादन केला.
आधुनिक शिक्षण व पारंपारिक शिक्षण यांच्यातील तफावतीवर प्रकाश टाकणारे "छडी लागे छमछम... विद्या येई घमघम..." हे बालनाट्य सादर केले या बालनाट्यास तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.अभिनवचा स्टार बालकलाकार आर्यन कांबळे यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर 'उत्कृष्ट अभिनय पुरस्कार' पटकावला तसेच स्कूलचे सहशिक्षक वाघमारे जी.ए यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.
या नाटकामध्ये 5वी ते 7वी मधील विद्यार्थी श्रेयस खांडेकर,सोहम सु.येलपले, प्रणव येलपले,पियुष कोळवले,प्रणव भंडगे,आर्यन कांबळे, सोहम प्र.येलपले,प्रफुल्ल लाडे,सलोनी लाडे,क्रितिका येलपले, श्रेया जाधव, सुप्रिया चोरमले,मानसी कोळवले,आर्यन विभुते, सायली येलपले,विशाल येलपले,शंकर आंबुरे,पार्थ तोंडले,सुमित येलपले, प्रथमेश एरंडे आदी बालकलाकारांनी आपला सहभाग उत्कृष्टरित्या नोंदविला.
मिळालेल्या यशाबद्दल स्कूलचे संस्थाध्यक्ष श्री.शिवाजी लाडे सर मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गातून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत