अस्तित्व सामाजिक संघटनेच्या वतीने अजनाळे येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न...
अजनाळे: सचिन धांडोरे: सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व संस्था सांगोला यांच्या वतीने काल बुधवार दिनांक २८ रोजी ग्रामपंचायत सभागृह अजनाळे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबराचे उद्घाटन अस्तित्व सामाजिक संस्थेचे शाहाजी गडहिरे, विष्णू देशमुख, नारायण पाटील, विशाल काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अस्तित्व सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून समाजउपयोगी उपक्रम राबवून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. नेत्र चिकित्सक डॉ ठेंगिल यांनी जवळपास ५३ रुग्णांची तपासणी करून अस्तित्व या संस्थेचे वतीने चांगल्या दर्जाचे या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुजाता देशमुख, उपसरपंच अर्जुन येलपले, ग्रामसेवक संदीप सरगर, आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल, आरोग्य सेविका सिंधू गडदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने हजर होते...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत