पायोनियर स्कूल यलमार मंगेवाडी येथील बिग बाजार, रांगोळी प्रदर्शन, कला प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न...
अजनाळे: पायोनियर स्कुल य मंगेवाडी येथे काल २९ डिसेंबर रोजी बिग बजार,रांगोळी प्रदर्शन,कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती शशिकांत येलपले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी अमोघ सिद्ध कोळी, यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिग बजार साठी शालेय विद्यार्थ्यानी भरघोस असा प्रतिसाद दिला तसेच कला व रांगोळी प्रदर्शनात ही विद्यार्थ्यांनी अतिशय हिरारिने सहभाग नोंदवला. आयोजित केलेल्या बिग बजार मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वस्तु,फळभाज्या, खाऊची दुकाने तसेच स्टेशनरी साहित्य मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी मांडली होती. आलेल्या प्रमुख पाहुण्यांकडून विद्यार्थ्यांनी केलेला उपक्रम अतिशय उल्लेखनीय असल्याचे आपल्या मनोगत गणातून व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत