*अजनाळे: सचिन धांडोरे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अजनाळे चे मुख्याध्यापक शामराव दशरथ कोळवले यांना नुकताच जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ दि ६ व ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह स्टेशन रोड अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी ११ ते १२.३० या वेळेत संपन्न होणार आहे.शामराव कोळवले यांना पुरस्कार जाहीर झाल्याने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी काल शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी शामराव कोळवले यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ, हार, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. शामराव कोळवले यांचे शैक्षणिक,राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा