Breaking News

१४ नोव्हेंबर २०२२

अभिनव पब्लिक स्कूल येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा..


 

अजनाळे:

       अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे येथे सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

        बाल दिनानिमित्त इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन केले. इयत्ता सहावीतील स्कॉलर विद्यार्थी अनिकेत कोळवले याने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष श्री शिवाजी लाडे सर व स्कूलच्या मुख्याध्यापिका कावेरी लाडे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

        पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर स्कूलमधील बालगोपाळांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले.स्कूलचे शिक्षक वर्षा देशमुख मॅडम व अक्षय बोडरे सर यांनी आपल्या भाषणातून बालदिनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.अध्यक्षीय भाषणात अनिकेत कोळवले याने चाचा नेहरूंविषयी माहिती मुलांना सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या फनी गेम्स घेण्यात आल्या.

          कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वंदना शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी श्रेया जाधव व क्रितिका येलपले यांनी केले तर आभार प्रदर्शन शर्वरी विभुते हिने केले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी इयत्ता सहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा