Breaking News

०३ नोव्हेंबर २०२२

मला मिळालेला पुरस्कार हा माझा नसून तो सर्व गावाचा आहे डॉ अशोक कलाल...


 अजनाळे: सचिन धांडोरे :   

अजनाळे :गेल्या दोन चार  वर्षाच्या काळामध्ये अजनाळे गावातील जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली.कोरोना काळात या गावातील  ग्रामस्थांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देऊन सहकार्य केले आहे. या कामाची दखल घेवुन स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पंचायत समिती सांगोला यांच्यामार्फत सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मला पुरस्कार देण्यात आला हा  पुरस्कार माझा नसून तो अजनाळे गावातील सर्व जनतेचा असल्याचे मत डॉ अशोक कलाल यांनी व्यक्त केले.

गुरूवार दि ३ नोव्हेंबर रोजी युवा नेते संदिप पाटील मित्र परिवारच्या वतिने डॉ अशोक कलाल यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी  संदीप पाटील, सुरेश धांडोरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, उद्योगपती विलास कोळवले, रमेश शेंबडे, बाळासाहेब देशमुख, कुंडलिक भंडगे, सोमनाथ धांडोरे, दीपक येलपले, राजाभाऊ कोळवले, संजय येलपले, प्रमोद धांडोरे, पोलीस पाटील रवी येलपले,अतुल पाटील  अक्षय भंडगे यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा