अजनाळे: अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे येथे गुरुवार दि. 20 ऑक्टोंबर 2022 रोजी माता पालक सभा व कला प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले .
या कार्यक्रमास आरती कोळवले अध्यक्षा म्हणून लाभल्या. बोंबेवाडी गावचे माता पालक सारिका गुरव,छाया चौगुले (पोलीस)तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका कावेरी लाडे , अभिनव पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष श्री. शिवाजी लाडे सर आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ' सावित्रीबाई फुले' यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत लाडे मॅडम यांनी स्कूलच्या प्रथम सत्रात घेण्यात आलेल्या निरनिराळ्या उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाची माहिती पालक वर्गास दिली. स्कूलच्या शिक्षिका सीमा कदम यांनी माता पालकांमध्ये आपल्या पाल्या विषयी जागृती निर्माण करत आपल्या पाल्याला 'लागतय ते द्या, मागतय ते देऊ नका' हा मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांची प्रगती ही माता पालक- विद्यार्थी-शिक्षक या तिघांच्या एकत्रित प्रयत्नाने कशाप्रकारे साधता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत चर्चा झाल्यानंतर सर्व माता-पालकांनी प्रथम सत्र परीक्षेचे पेपर पाहून समाधान व्यक्त केले.
स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाश कंदील,पणती आणि ग्रीटिंग यांचे कला प्रदर्शन पाहताना पालकांनी कौतुकाचा वर्षाव केला. इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'राजगड' हा प्रदर्शनाचा विशेष आकर्षक घटक ठरला. स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या माता-पालक सभेस व कला प्रदर्शनास पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल कोळवले यांनी तर आभार प्रदर्शन पूजा होटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा