Breaking News

०२ ऑक्टोबर २०२२

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत आंबेडकरी चळवळीचे नेते वैभव गीतेंची चर्चा...

 



चेंबूरच्या रुपाली चंदनशिवेची हत्या करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी ..


विधानभवनात गृह,विधी,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची संयुक्त बैठक बोलावून अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात......वैभव गिते 


 मुंबई वल्डट्रेड सेंटर कुलाबा येथे जेष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर आले होते.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकरांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. निवेदनात राज्यातील बौद्ध,मातंग,चर्मकार,होलार, यांच्यासह दलित आदिवासींचे 632 खून झाले आहेत या सर्व खून प्रकरणात शासकीय नोकरी,जमीन व पेंशन देऊन कुटुंबांचे पुनर्वसन करावे.व एट्रोसिटीऍक्टच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 1 ते 22 कायदेशीर मुद्यांवर कारवाई करावी. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चधिकार व दक्षता नियंत्रण समितीची स्थापना करावी.मंत्रालयात प्रधान सचिवांच्या दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांची नियुक्ती करावी. तसेच चेंबूर येथील रुपाली चंदनशिवे या तरुणीने इक्बाल महंमद शेख मुस्लिम तरुणाशी एकमेकांच्या संमतीने अंतरजातीय विवाह केला होता.आरोपी इकबाल शेख याने रुपाली चंदनशिवे हिची निर्घृणपणे हत्या केल्याने चेंबूर टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये भादवी 302 नुसार गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (एट्रोसीटी) ची कलमे वाढवावीत.मूदतीत दोषारोपपत्र दाखल करावे. पीडित कुटुंबास खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण द्यावे.वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी देण्याची मागणी केली.यावेळी लाईव्ह महाराष्ट्र टुडे चे संपादक राहुल सावंत हे उपस्थित होते. नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर येथील रुपाली चंदनशिवे हत्या प्रकरणाच्या घटनेचा पाठपुरावा सुरू आहे.विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा