Breaking News

सांगोला तालुका खते औषधे बि-बियाणे विक्रते संघटना यांची कोळा गटाची जुनोनी येथे बैठक संपन्न..


 अजनाळे:सचिन धांडोरे:   सांगोला तालुका खते औषधे बि-बियाणे आणि विक्रेते संघटना यांची कोळा गटाची बैठक काल मंगळवार दि ११ ऑक्टोंबर रोजी  अविनाश शेटे यांच्या गोडावून मध्ये  तालुकाध्यक्ष सत्यवान (पिंटु) घाटुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.                                            या वेळी कोळा,जुनोनी,पाचेगाव,गौडवाडडी,हातीद,जुजारपुर या गावातील औषध विक्रते बि-बियाणे या  विक्रेत्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यानंतर या कोळा गटातील सर्व औषध विक्रेत्यांची दुकाने दर मंगळवारी बंद  ठेवणे बाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना नवीन पिकाबद्दल मार्गदर्शन करणे बदलते हवामानाबद्दल चर्चा झाली या संघटनेचे वतीने सामाजिक उपक्रम राबवणे अशा अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी विनायक शेटे, नानासो शिंदे, आमोल मेखले,विठ्ठल कोळेकर,हणमंत बोधगिरे,विजय मरगळे, कृष्णा शिंदे, अक्षय शिंदे, आप्पासो भुईटे,विशाल बिले,निवांत घोडके, पोपट माळी, बळीराम माळी,नानासो माळी, सतिश बोधगिरे, आप्पा माळी,आप्पासो बोधगिरे,, दादासो खटके,अजित लवटे,दत्तात्रय बुरकुल, अविनाश शेटे, सचिन घाडगे,अमर चोरमले, बंजरंग हिप्परकर, स्वप्निल माळी, समाधान लवटे, दिनकर पाटील,दशरथ  धुरूषे, विनोद व्हनमाने, संग्राम व्हनमाने, भारत सावंत, सतीश मिसाळ यांच्यासह अन्य औषध विक्रेते मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कोळेकर यांनी केले तर आभार दत्ता बुरकुल यांनी केले. फोटो चौकट : सांगोला तालुका खते औषधे बी- बियाणे विक्रेते संघटना तालुकाध्यक्ष सत्यवान (पिंटू) घाटुळे, उपाध्यक्ष रमेश अनुसे यांचा शाल श्रीफळ हार फेटा बांधून कोळा गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत