सांगोला तालुका खते औषधे बी -बियाणे विक्रेते संघटना यांची जवळा गटाची बैठक संपन्न...
अजनाळे:सचिन धांडोरे: सांगोला तालुका खते औषधे बि-बियाणे विक्रेते संघटना यांची जवळा गटाची बैठक काल बुधवार दि.१२ ऑक्टोंबर रोजी चंद्रकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी लायसन्स रिन्यू करणे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली गोळी खतांच्या लिंकिंग बंद करण्याबाबत संघटनेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली. देशी कोर्स बद्दल माहिती दिली. तालुका संघटनेचे सभासद होण्याचे सर्वांनुमते समंती दिली संघटनेच्या वतीने सामाजिक काम करणे नवीन पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणे समाज उपयोगी कार्यक्रम राबवणे इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सत्यवान (पिंटू) घाटुळे उपाध्यक्ष रमेश अनुसे, शंकर जगधने,समाधान बुरुंगले,कोंडिबा दौलतोडे,महादेव गायकवाड,संजय पाटील, मारुती गडदे,संजय सावंत,सुनिल गायकवाड, आकाश गायकवाड, रमेश साळुंखे, समाधान काशिद, प्रवीण गव्हाणे, रमेश साळुंखे पाटील, समाधान कोळेकर, विकास पडळकर, पांडुरंग पुकळे, चंद्रकांत देशमुख, सुनील यमगर, आदित्य यमगर, विश्वजीत मोरे, प्रशांत गायकवाड, मयूर जाधव, रावसाहेब इंगोले, नामदेव सलगर, सुनील साळुंखे, दिगंबर गायकवाड,सलमान पटेल, राजाभाऊ गावडे, गोरख काशीद, किरण सावंत, सचिन सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय गायकवाड यांनी केले तर आभार समाधान काशीद यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत