बहुजन समाज पार्टीच्या वतीने दौंड तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन..
प्रतिनिधी / संतोष कदम.
दौंड :- बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभेच्या वतीने दौंड तहसील कार्यालय येथे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, अवैध धंदे, देशातील अनुसूचित जाती जमाती व मुस्लिम बांधवानवरील वाढत्या अन्याय अत्याचार विरोधी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पार्टीच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव मा. अजितजी ठोकळे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. रमेशजी गायकवाड, पुणे जिल्हा सचिव मा. उमाकांत कांबळे, पुणे जिल्हा BVF मा. योगेश कांबळे, दौंड विधानसभा अध्यक्ष मा. विशालजी सोनवणे, दौंड विधानसभेचे इतर पदाधिकारी कोषाध्यक्ष - मा. अमनभाई शेख, महासचिव - गोरख ननवरे, उपाध्यक्ष - तुषार सवाने, अभिजित डेंगळे, सुनिल शिंदे, हर्षल पाटोळे, अनिल थोरात, बबन थोरात, वाहिद सय्यद, शिवशरण संगेपान, बाळू विजेगत, सुरेश झेंडे, राहुल चलवादी, सचिन काकडे, राहुल कंकाळे, जावेदभाई शेख, तुषार सवाने, मनोहर कोकरे, ऍड. अनिल कांबळे, ऍड. आर. बी. शिंदे, ऍड. शशिकांत गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत