अजनाळे:सचिन धांडोरे: सांगोला तालुका खते औषधे बि-बियाणे आणि विक्रेते संघटना यांची अजनाळे तालुका सांगोला येथे नाझरा गटाची बैठक काल मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी १ वा अजनाळे येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका अध्यक्ष सत्यवान (पिंटु)घाटुळे हे उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने नाझरे गटातील दर शनिवारी दुकाने बंद ठेवणे असा सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला. त्यानंतर समाजामध्ये सामाजिक कार्यक्रम राबवणे, शेतकऱ्यांना नवीन पिकाबद्दल मार्गदर्शन करणे इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला कमलापुर,यलमर मंगेवाडी, चिणके,वझरे,अजनाळे, बलवडी,नाझरा,चोपडी,लोटेवाडी,अचकदाणी या भागातील जवळपास २९ दुकानदार उपस्थित होते. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश अनुसे, कार्यकारणी सदस्य सुनील कोळवले, सूर्यकांत मिसाळ, तानाजी कवठेकर, विजय आदाटे, सचिन खळगे, संतोष कोळवले, विश्वंभर बाबर, बाळासो कोकरे, अतुल कोळवले, सचिन येलपले, चंद्रकांत कोळवले, कैलास कुरे,शफिदीन शेख, जयंत गोडसे, माऊली राऊत, विजय लोकरे, समाधान धायगुडे, भाऊसो चौगुले, आरिफ काझी, अमोल मेखले, सुयश शिंदे, स्वप्निल येलपले, भोजलिंग बंडगर, अरुण येलपले, सुनील भंडगे, अविनाश चौगुले, मोहन अनुसे, अरुण शेंबडे यांच्यासह अन्य दुकानदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सूर्यकांत मिसळ सर यांनी मानले या कार्यक्रमाला नाझरे गटातील सर्व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा