Breaking News
२९ ऑगस्ट २०२२
अकोला येथिल शैलेश कुंभार यांच्या आकर्षक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी..
अजनाळे:समाधान धांडोरे कोरोणा महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासुन गणेश उत्सह साजारा करण्यासाठी शासनाकडुन कडक निबंर्ध लागु केले होते.परंतु या वर्षी शासनाकडुन गणेश उत्साहावर कोणतेही निर्बंध लागु केले नाहीत. वासुद अकोला येथिल शैलेंश कुंभार यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिस या पासुन ४ ते ५ हजार आकर्षक गणेशमुर्ती बनवल्या असल्याची माहिती शैलेश कुंभार यांनी दिली.
वडिलोपार्जित पारंपारिगत व्यवसाय करणाऱ्या वासुद अकोला ता. सांगोला येथील शैलेश कुंभार हे गेल्या पंचवीस वर्षापासून आकर्षक व सुबक गणेश मूर्ती बनवतात मुर्ती बनवण्यासाठी साधारण पाच ते सहा महिने लागतात तीन महिने मुर्ती तयार करणे आणि तीन महिने कलर कामासाठी इतका कालावधी लागतो
यामध्ये वडील आई पत्नी असे सर्वजण मिळून आकर्षक गणेश मूर्ती बनवतात
त्यांच्या गणेश मूर्तींना मंगळवेढा,पंढरपुर ,सांगोला ,आटपाडी ,खानापूर ,सांगली ,मोहोळ ,सोलापूर, माढा ,कुर्डूवाडी इत्यादी भागात त्यांच्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
कोरोनाच्या महामारीनंतर तब्बल दोन वर्षानंतर प्रत्येक व्यवसायीक नव्याने उभारी घेत आहेत त्यामुळे मूर्ती खरेदीसाठी किरकोळ विक्रेत्यांची रेलचेल सुरू आहे सध्या सांगोला तालुक्यामध्ये गणेश मूर्तीचा बराचसा तुटवडा जाणवत आहे तरीदेखील शैलेश कुंभार यांनी आपल्या असंख्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षक व सुबक गणेश मूर्ती दिल्या आहेत यामध्ये
लालबागचा राजा, पूजा बैठक, दगडूशेठ, प्राण्यांवरील मूर्ती, बालगणेश इत्यादी प्रकारच्या मूर्तींना जास्त प्रमाणात मागणी असते अशा लक्ष वेधून घेणाऱ्या गणेश मूर्ती शैलेश कुंभार आणि कुटुंबीयांनी तयार केल्या आहेत त्यामध्ये त्यांचे वडील- शिवाजी दगडू कुंभार ,आई -शोभा शिवाजी कुंभार, आणि पत्नी- दिपाली शैलेश कुंभार आणि स्वतः - शैलेश शिवाजी कुंभार अशा संपूर्ण परिवाराने तब्बल सहा महिने परिश्रम घेऊन या मूर्ती तयार केल्या आहेत त्यांच्या या आकर्षक व सुबक गणेश मूर्तींना तालुक्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा