श्रीधर कन्या प्रशाला व जुनि.कॉलेज नाझरे येथे शेकापचे जेष्ठ नेते स्व. गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांची जयंती साजरी
नाझरे प्रतिनिधी:
श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेज येथे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी रो.ह.यो. मंत्री स्व. गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांचा ९९ वा जन्मदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य नेताजी शिंदे सर तसेच जेष्ठ शिक्षक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळीआबासाहेबांच्या जीवन कार्याविषयी कलाशिक्षक श्री. शिवभूषण ढोबळे सर यांनी आपले विचार व्यक्त केले . त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगताना त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांची भाषणे व खाऊवाटप केले.देशाच्या राजकारणात तत्व निष्ठेशी ठाम,चारित्र्यसंपन्न तसेच अख्ख आयुष्य गोरगरीब,कष्टकरी,दिन-दलित,शेतकऱ्यांसाठी समर्पित करणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. नवनाथ बंडगर सर यांनी केले याप्रसंगी प्रशालेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत