भारतीय बौद्ध महासभा मंगळवेढा तालुका कार्यकारणी जाहीर . तालुका अध्यक्ष पदी संभाजी कांबळे यांची निवड .
मंगळवेढा विशेष प्रतिनिधी :येताळा खरबडे
मंगळवेढा तालुका भारतीय बौद्ध महासभा तालुका कार्यकारणी पुनर्बांधणी नव्याने निवडण्याची बैठक आज दिनांक ९/८/२०२६रोजी सकाळी साडेअकरा वाजता नगर वाचनालय चोखामेळा चौक मंगळवेढा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
निवड प्रक्रिया भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पूर्व महिला अध्यक्षा केंद्रीय शिक्षिका सरचिटणीस आद. नंदाताई काटे, संरक्षण विभागाध्यक्ष यशवंत साबळे, सोलापूर शहर अध्यक्ष अमित गायकवाड, युनिट लीडर सैनिक बुद्धरत्न लंकेश्वर यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आयु विठ्ठल सरवदे माजी तालुकाध्यक्ष सध्याचे जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असणारे यांनी भूषवले. अनुमोदन संभाजी कांबळे यांनी दिले भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारणी मध्ये कार्यरत असणारे निरीक्षक म्हणून उपस्थित असणारे यशवंत साबळे अमित गायकवाड नंदाताई काटे यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी यांचा सत्कार करण्यात आला ह्या निवडी मुलाखती द्वारे करण्यांत आल्या भारतीय बौद्ध महासभा तालुका मंगळवेढा अध्यक्षपदी संभाजी शिवाजी कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच तालुका सरचिटणीस पदी विठोबा ज्ञानू क्षीरसागर, तालुका कोषाध्यक्ष आबासाहेब जीवापा गायकवाड, तालुका संघटक बलभीम संभाजी शिवशरण, तालुका संस्कार प्रमुख अभिमन्यू कर्ण आठवले, तालुका संरक्षण प्रमुख सिद्धार्थ शिवाजी शिंदे, मंगळवेढा शहर प्रमुख सिद्धार्थ लोकरे, शहर सचिव पदी मैनीनाथ खरबडे यांच्या निवड करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भास्कर लोकरे ,अशोक जी माने, सोमनाथ जी ढावरे, गौतम ढावरे , मधुकर भडंगे, साधना जाधव, , बाबू वाघमारे , दिलीप कसबे , विठ्ठल शिवशरण, संजय सरवदे, लखन शिंदे, युवराज सावंत, सिद्धेश्वर सोनवले, अरुण शिवशरण, अनंता वाघमारे , श्रावण सरवदे, दत्तात्रय सरवदे,विठ्ठल क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ह्या निवडी करण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ शिंदे यांनी केले शेवटी अध्यक्ष विठ्ठल सरवदे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत