Breaking News

चोपडी येथील गाव तलावाचे लवकरच सुशोभीकरण करू.. - आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख...! चोपडी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..


 सांगोला प्रतिनिधी 

      चोपडी ग्रामस्थांनी 18000 झाडे जगविण्यासाठी पाणी मिळावे यासाठी सांगोला येथील वन खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते 

व त्या झाडांना पाणी मिळावे म्हणून मी माझ्या पगारातून पैसे दिले जातील किंवा सर्व खर्च देऊ या मान्यता दिली व तो प्रश्न सोडविला व त्याचप्रमाणे सिद्धनाथ यात्रेनिमित्त येथील गाव तलाव पाण्याने भरला परंतु यामध्ये अधिक पाणी बसावे म्हणून 

त्याचे लवकरच आपण सुशोभीकरण करू असे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सिद्धनाथ मंदिरासमोर यात्रेनिमित्त केलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मत व्यक्त केले. 

   राजकारण सोडून गावाच्या विकासासाठी एकत्र या असे आवाहनही आमदार देशमुख यांनी यावेळी केले. तर इंजिनियर गणेश बाबर यांनी आमदार बाबासाहेब देशमुख हे वचनाला जागणारे आमदार आहेत व त्यांच्यामुळे आमच्या गावातील 18000 झाडांना पाणी मिळाले व यासाठी पत्रकार रविराज शेटे सर यांनीही सहकार्य करून योगदान दिले त्याबद्दल आम्ही यात्रा कमिटीतर्फे आम्ही दोघांचा भव्य सत्कार करीत आहोत असे सांगितले. यावेळी ट्रॅक्टर शर्यत, खिलार बैल, गाय यांचे नंबर काढून बक्षीस दिले तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच शिवरत्न स्टील तर्फे यात्रेत तीन दिवस मोफत पिण्याचे शुद्ध व थंड पाणी दिल्याबद्दल संतोष बाबर व बाबर परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे उद्योजक सतीश पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवबा हेच का आपले सुराज्य या भव्य दिमाखदार नाटकाचे संतोष शेठ बाबर, नंदू शेठ बाबर, शरद शेठ बाबर, दत्ता शेठ बाबर, बाळासो बाबर फौजी, मा. सरपंच सुरेश बाबर इ. च्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

   सदर प्रसंगी मा. जि प सदस्य दादासो बाबर, आबा शेठ बाबर, संतोष शेठ बाबर, सिद्धनाथ मंदिरचे राजारामबाबर, मा. सरपंच रामचंद्र केंगार, मा. उपसरपंच माऊली बाबर, डॉक्टर नवनाथ बाबर, शिक्षक जनार्दन बाबर, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उद्योजक सतीश पाटील यांनी तर सर्वांचे आभार गणेश बाबर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत