Breaking News

नाझरे मठ ते नाझरे रोडवर चार चाकी व दुचाकीचा भीषण अपघात...! महिलेचा जागीच मृत्यू


 नाझरे प्रतिनिधी

         दि 27 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाझरे मठ कडून येणाऱ्या चार चाकी वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका वयोवृद्ध दांपत्यास पाठीमागच्या बाजूस जोराने धडक दिल्याने सदर दुचाकी वरील एका महिलेचा जागीच उपचारापूर्वी मृत्यू झाला तर त्या महिलेचे पती यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. याबाबत अधिक माहिती अशी की वझरे ता सांगोला येथील रहिवासी रावसाहेब शंकर रेड्डी हे त्यांच्या पत्नी रतन रावसाहेब रेड्डी (वय ६५) यांना घेऊन मोटरसायकल MH 45 AA 2026 वरून कारंडेवाडी येथे नातेवाईकांकडे जाऊन परत येत होते सदर प्रसंगी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नाझरेमठ ते नाझरे रोडवर आले असता पाठीमागच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या MH 12 KT 1091 या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने रतन रेड्डी यांचा जागीच उपचारापूर्वी मृत्यू झाला. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारचालक कन्हैया हरिचंद्र सोनवणे रा.नाझरे हा भरधाव वेगाने चार चाकी चालवत होता व नियंत्रण गमावल्याने सदर अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी बोलून दाखवले. जखमींना सांगोला येथील मोहन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी रतन रेड्डी यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले तर पति रावसाहेब रेड्डी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते बेशुद्ध अवस्थेत उपचार घेत असल्याबाबत माहिती मिळाली. 

        सदर अपघाताबाबत फिर्यादी स्वप्नील तुकाराम रेड्डी रा. वझरे ता सांगोला यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत