Breaking News

बलवडी येथेआनंद अनुभुती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आरोग्य व सकारात्मकतेचा संदेश


 सांगोला प्रतिनिधी

बलवडी येथे Art of Living  आयोजित आनंद अनुभुती शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 20 ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत बलवडी कन्या प्रशाला येथे हे शिबिर पार पडत आहे.

या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना निरोगी शरीर व सुदृढ मन यासाठी विशेष मार्गदर्शन केले जात आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, भिती, चिंता व राग यांसारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्तता मिळवणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे यावर भर दिला जात आहे.

शिबिरात योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यान तसेच जीवन कौशल्य व ज्ञान यांचे प्रशिक्षण दिले जात असून अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे दैनंदिन ताणतणाव कमी करून मानसिक शांतता मिळवण्यास मदत होत असल्याचे सहभागींचे मत आहे.

आयोजकांनी सांगितले की, या शिबिरासाठी वयाची अट 18 वर्षे पूर्ण असावी अशी आहे. इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिरासाठी येताना सहभागीनी पाण्याची बाटली तसेच स्वतःसाठी योगामॅट, सतरंजी किंवा जाड बेडशीट घेऊन यावे, असेही आयोजकांनी नमूद केले आहे. अधिक माहितीसाठी :   9503338395/.   9011283868  या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे परिसरात आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत