Breaking News

नाझरे येथील वीरभद्र मंदिरात जगद्गुरु रेणुकाचार्य शिवाचार्य यांचा प्रकट दिन साजरा..


नाझरे प्रतिनिधी 

     वीरशैव धर्म संस्थापक जगद्गुरु रेणुकाचार्य श्री कोलनुपाक येथे सोमेश्वर महालिंगातून प्रकट होऊन मलय पर्वतावर वास करणाऱ्या महामहीम श्री अगस्ती ऋषींना वीरशैव सिद्धांताचा उपदेश केला, तो उद्देश श्री शिवयोगी शिवाचार्यांनी संग्रहित करून लिहून ठेवला आहे व तो संग्रह आज श्री सिद्धांत शिखामणी या नावाने प्रसिद्ध आहे अशा या जगद्गुरु रेणुकाचार्य यांनी एका तपाच्या कालावधीत केलेले उज्वल कार्य ही एका शतकाच्या कालावधीत केलेल्या कार्याची बरोबरी करणारी आहेत असे पत्रकार रविराज शेटे यांनी वीरभद्र मंदिरात जगद्गुरु रेणुकाचार्य प्रकट दिन सोहळ्यात वीरभद्र मंदिरात सांगितले.

सुरुवातीस प्रतिमेचे पूजन पत्रकार रविराज शेटे, भाजपाध्यक्ष नंदकुमार रायचुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम ही संपन्न झाला तसेच पुरोहित म्हणून रविराज स्वामी व बाळासो स्वामी यांनी काम पाहिले, तर यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शिवया स्वामी, सिद्धेश्वर झाडबुके, लक्ष्मण काका पाटील, तमा काका पाटील, मुकुंद पाटील, बाळासो पाटील, भारत पाटील, नितीन काळे, राजू पाटील, उल्हास स्वामी, राजू शिवाप्पा पाटील, राजू दत्तात्रय पाटील, दत्ता चौगुले, भारत विभुते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत