Breaking News

बलवडी येथील कै. मा. सरपंच शिवाजी दादा लिगाडे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, शोकसभा संपन्न...! हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले..- मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील


 

नाझरे प्रतिनिधी 

     कै. नानासाहेब लिगाडे सरकार दानशूर होते, त्यांनी अनेकांना जमिनी दान केल्या व कै. मा. आमदार काकासो साळुंखे पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबास सावरण्याचे काम शिवाजी मामाने केले व त्यांच्या या अकाली निधनाने लिगाडे कुटुंबाबरोबर साळुंखे पाटील कुटुंबाचे ही वैभव हरपले व शिव दादा हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते, त्यांच्या निधनाने साळुंखे पाटील कुटुंबाचे नुकसान झाले असे मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी बलवडी ता. सांगोला येथे शिवाजी दादा लिगाडे यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधी कार्यक्रमात शोकसभे प्रसंगी मत व्यक्त केले. 

     सुरुवातीस सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे, मा. सरपंच बाळासो शिंदे, विजय दादा शिंदे, दत्तात्रय कारंडे सर, राऊत सर, पंडित भाऊसो, अण्णासो घाडगे, दादासो हरिहर, डॉ राज मिसाळ, भिकाजी बाबर, ज्येष्ठ नेते बाबुराव भाऊ गायकवाड, शिवाजी दादा गायकवाड, माजी जिल्हा फॉरेस्ट अधिकारी माणिक भोसले, एडवोकेट संपत पाटील, आदर्श शिक्षक सिद्धेश्वर झाडबुके, यांनी शिव दादाचा इतिहास सांगितला व बलवडी गावाबरोबर सांगोला तालुक्याचे त्यांच्या निधनाने नुकसान झाले असे सांगितले. यावेळी शिवसेना नेते सागर दादा पाटील, खरेदी विक्री चेअरमन रमेश जाधव, मा.जि.प. सदस्य दादासो बाबर, पं. समिती सदस्य अजय सरगर, सरपंच ज्ञानेश्वर राऊत व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व राजकीय, शैक्षणिक, शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ, शिव दादा प्रेमी, लिगाडे, साळुंखे पाटील परिवार उपस्थित होता.

   

कै. मा. आमदार काकासो साळुंखे व कै. मा. सरपंच शिवदादा लिगाडे यांचा वारसा वसा जपण्याचे काम मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील करीत आहेत व यापुढे शिवदादाचा आदर्श विचार सर्वांनी पुढे चालवावा हीच खरी श्रद्धांजली..

  मा. संभाजी तात्या आलदर

   *मा. सभापती सांगोला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत