Breaking News

आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य पोथीची नाझरे येथे समाप्ती


 नाझरे प्रतिनिधी 

      नाझरे ता. सांगोला येथील मारुती मंदिरात दिवंगत सोपान शेलके गुरुजी, बाबुराव रायगावकर गुरुजी, पांडुरंग काका देशपांडे गुरुजी व जगन्नाथ देशपांडे गुरुजी यांनी पोथी वाचन केले व आज त्यांचा वारसा वसा टिकवण्याचे काम पोपट स्वामी करीत आहेत याचा नागरेकराचा अभिमान आहे असे बाळू काका देशपांडे यांनी आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य पोथीच्या समाप्ती प्रसंगात मत व्यक्त केले. 

     यावेळी विजय बलभीम सोनार व सौ यशोदा सोनार यांच्या शुभहस्ते महारती करण्यात आली. पुरोहित म्हणून रविराज स्वामी यांनी काम पाहिले, तर तम्मा पाटील यांच्या शुभहस्ते पोपट स्वामी व सौ लक्ष्मी स्वामी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर हरिश्चंद्र सोनवणे, भारत शेलके व लक्ष्मण काका पाटील यांनीही पोथी वाचण्यासाठी दिली, तर संत तुकाराम महाराज चरित्र या नवीन पोथीचे वाचन करण्यास सुरुवात केली. यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रसाद वाटप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत