Breaking News

सांगोला येथे नूतन जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांचा मोरया अर्बनकडून सत्कार


सांगोला : जवळा जिल्हा परिषद मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले अतुल पवार यांचा सांगोला येथील मोरया अर्बन संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

जवळा जिल्हा परिषदेमध्ये कामाचा धडाका लावून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे मतदारांनी अतुल पवार यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. त्यांच्या कामाची दखल घेत मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या या यशाबद्दल आणि समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल मोरया अर्बन सांगोला यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी मोरया अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहन लिगाडे, व्हाईस चेअरमन संदीप पाटील, सचिव धनाजी नष्टे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अतुल पवार यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना अतुल पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी पुढील काळातही समाजहितासाठी काम करत राहणार असल्याचे सांगितले. अजूनही मतदारसंघात अनेक कामे पूर्ण करायची असून येत्या काळात ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमात उपस्थितांनी विकासकामांबाबत चर्चा केली तसेच परिसराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. या सत्कार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत