Breaking News

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांना अध्यात्मिक गुणगौरव पुरस्कार प्रदान..


सांगोला प्रतिनिधी 

     आधि गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरतील पाप

   हेच विचार मनात घेऊन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव येथील गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांना कविराज मंगल कार्यालय सांगोला येथे सी बी एस न्यूज चैनल तर्फे आध्यात्मिक गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

      पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, उपाध्यक्ष चांद भैया शेख, शिवसेना नेते सागर दादा पाटील, नूतन जि.प. सदस्य चेतन सिंह केदार, अतुल मालक पवार, नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने, कार्यकारी संपादक रविराज शेटे, उपसंपादक राजाभाऊ गुजले, ज्येष्ठ अभिनेते महादेव शिरोळकर, सुनील शेटे, अमोल नाईक, संदीप कुडचिकर, अभिनेत्री रोशनी इरावेना, ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब चव्हाण यांच्या शुभहस्ते गुरुवर्य पाटील काका यांना शाल, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन अध्यात्मिक गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सध्या अध्यात्माकडे सर्व जाती धर्माचा ओढा वाढला आहे कारण शेवटी बरोबर तेच येत आहे व एक मुस्लिम सीबीएस न्यूज चैनल चे संपादक चांद भैय्या शेख असून त्यांचा सुद्धा आध्यात्मिकाकडे ओढा आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी पुरस्कार प्रदान प्रसंगी मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत