संगेवाडी येथे श्री महादेव मंदिर व श्री प्रभू अण्णा महाराज मंदिराचा कळसा रोहण कार्यक्रम दहिवडीकर महास्वामीजींच्या हस्ते संपन्न
सांगोला प्रतिनिधी:
||गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती| गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु तोचि सचिदानंद|| गुरुचे करा भजन, गुरु करी दुःख निवारण|गुरु माझा योगीराणा|| गुरुपायी श्रद्धा हीच खरी गुरुदक्षिणा||
हेच विचार मनात घेऊन संगेवाडी ता. सांगोला येथे निगमागमनिरज भास्कर वेदांताचार्य श्री गुरु 108 गुरु सिद्ध मणि कंठ शिवाचार्य दहिवडीकर महाराज लक्ष्मी दहिवडी यांच्या अमृत हस्ते श्री महादेव मंदिर व श्री प्रभू अण्णा महाराज या मंदिराचा कळसा रोहन सोहळा भक्ती भावाने संपन्न झाला. सदर प्रसंगी कळसाची व गुरुची भव्य मिरवणूक गावातून काढून, महा मंगल आरती, माहेरवासीन ओटी भरण व भजन तसेच गुरुचे प्रवचन व महाप्रसाद वाटप करण्यात आला.
चांगले काम हातात घेतले की विघ्न भरपूर येतात परंतु संगेवाडी येथे भोलेनाथांचा, प्रभू अण्णा चा व गुरुचा आशीर्वाद असल्याने भव्य दिव्य महादेवाचे मंदिर बांधले व त्याचा कळसा रोहन व प्रभूंनाच्या मंदिराचा कळसा रोहन कार्यक्रम गावाच्या सहकार्यामुळे, तसेच यामध्ये जेष्ठ मंडळी, नेतेमंडळी, युवा वर्ग, महिला यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम फार सुंदर केला व गावात धार्मिकता वाढविण्याचा प्रयत्न केला तसेच तन-मन-धनाने सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम केल्यामुळे सर्वांना आशीर्वाद आहे. तसेच संगेवाडी कर भाग्यवान आहेत कारण एवढा भव्य दिव्य सोहळा नियोजनबद्ध केला असे भास्कर वेदांताचार्य श्री गुरु 108 गुरु सिद्ध मणि कंठ शिवाचार्य दहिवडीकर महाराज यांनी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी पुरोहित म्हणून महादेव स्वामी, ओम स्वामी, आकाश स्वामी यांनी काम पाहिले.
सदर प्रसंगी मुख्याध्यापक वसंत खंडागळे, रावसाहेब ताटे गुरुजी, अचिकेत खंडागळे, सरपंच समाधान होवाळ, उपसरपंच नागनाथ नष्टे, सुधीर खंडागळे, सुभाष पाटील, चंद्रकांत खंडागळे, राजेंद्र पवार, हरिभाऊ ताटे, बसवेश्वर पाटणे, रविराज स्वामी, नंदू स्वामी, स्वामी भाऊसाहेब, पत्रकार रविराज शेटे, सुधाकर खंडागळे, दीपक शिंदे, प्रभाकर पवार, धनाजी पवार, पांडुरंग खंडागळे, देविदास पवार, माणिक खंडागळे, गडया स्वामी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत