नाझरे विद्यामंदिर प्रशालेमध्ये दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत व शुभेच्छा प्रदान..
नाझरे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी नाजरा विद्या मंदिर प्रशालेमध्ये सुरळीत रित्या सुरू झाली, यामध्ये 338 विद्यार्थी प्रविष्ट असून, नाजरा विद्यामंदिर हे केंद्र असून, यामध्ये ना जरा विद्यामंदिर, श्रीधर कन्या प्रशाला, बलवडी हायस्कूल, बलवडी कन्या प्रशाला व गुरुकुल राजुरी या शाळेचा सहभाग आहे.
परीक्षेस सुरुवात होण्याअगोदर केंद्र संचालक बिबीशन माने, उपकेंद्र संचालक नेताजी शिंदे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. व या स्वागतामध्ये केवळ पुष्प नव्हते तर प्रेरणेची सुवासिक साथ होती व आत्मविश्वास वाढवण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी शाब्बासकीची थाप होती व सर्वांना उज्वल यश प्राप्त होवो या शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत