Breaking News

हिंदवी स्वराज्याचे महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जत्तीवस्ती संख शाळेमध्ये जल्लोषात साजरी


 सांगोला प्रतिनिधी 

          अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, ज्यांच्या कर्तबगिरीने व कार्य कुशल नेतृत्वामुळे व विचारधारेमुळे सर्वांच्या मनावर आज देखील अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जि प प्रा मराठी शाळा जत्तीवस्ती संख शाळेमध्ये अगदी धुमधडाक्यात व जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा पराक्रम, व ज्यांनी खऱ्या अर्थाने मानवतेची व सुयोग्य विचारधारेची मुहूर्तमेढ रोवली असे रयतेचे राजे म्हणून ज्यांचा उल्लेख आज देखील इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलेला आहे तसाच काहीसा लोकांच्या मनावर देखील उमटलेला आहे असे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शाळेत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. 

        सदर वेळी प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अप्पासाहेब जत्ती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण माळी, शिक्षक प्रणवराज शेटे, संतोष जत्ती, सिद्धराय जत्ती, मारुती ठोंबरे, कोमल ठोंबरे, प्रियांका ठोंबरे, भौरव्वा जत्ती, सौ बागेळी, सौ राठोड, पुनम ठोंबरे आधी पालक बहुसंख्येने उपस्थित होते तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत