Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज स्त्री नाचवणारे नव्हते तर स्त्री वाचवणारे राजे होते.. कुमारी शरण्या जाधव


 सांगोला प्रतिनिधी 

      जिजामाता या शिवरायांच्या गुरु होत्या. जिजामातेने त्यांना स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू पाजले म्हणूनच परस्त्री मातेसमान मानणारा व शत्रूच्या स्त्रियांना सन्मान देणारा युगपुरुष म्हणून शिवरायांची इतिहासात नोंद झाली व खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे होते, रक्षण करते होते व स्त्री संबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच उलट कठोर शिक्षा होती मग तो कोणीही साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार अगर कोणीही त्याला कठोर शिक्षा दिल्या जात होत्या म्हणजे स्त्रियांचा योग्य सन्मान करणारे राजे होते व ते स्त्री नाचवणारे नव्हते तर स्त्री वाचवणारे राजे होते असे मत कुमारी शरण्या जाधव यांनी शिवजयंती सोहळ्यात वझरे ता. सांगोला येथे व्यक्त केले. 

    भक्ती व मानवतेचे प्रतिक राजे होते व महाराजांचा एक मावळा 100 जणांना भारी होता व शिवाजी राजापूर्वी अनेक राजे झाले परंतु शिवछत्रपती एकच होते व रयतेचे काळजी घेणारे होते तसेच शेतकऱ्यावर त्यांचे प्रेम होते परंतु आज इतिहास पुसण्याचा प्रकार होत आहे तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, व रस्त्याला महाराजांचे नाव दिले जात आहे परंतु खऱ्या अर्थाने राजाच्या विचाराच्या रस्त्याने चालणे ही आजची गरज आहे व आज साडेतीनशे वर्षे झाले तरी शिवाजी या तीन अक्षरात एवढी जादू आहे की ते सर्वांचे बाप होते व छत्रपतींचा आदर्श मनी बाळगून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे असेही शरण्या जाधव हिने यावेळी सांगितले. सुरुवातीस प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव घोषणा देऊन मानस पवार व तेजस पवार या बालचिमुनी सर्वांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज हे आजच नव्हे तर पुढील शेकडो वर्षे आदर्श ठरणार आहेत परंतु तरुणांनी नुसते महाराजांचे स्टेटस ठेवून चालणार नाही तर त्यांचे विचार मनात रुजविणे गरजेचे आहे, व बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केले तसेच बहिरीजी नाईक सारखे गुप्तहेर होते तरी नव्या पिढीने राजाचा आदर्श घेऊन काम करणे गरजेचे आहे असे मत शिक्षक नेते देवानंद जंबगी यांनी यावेळी सांगितले. 

     सदर प्रसंगी सरपंच मल्हारी चव्हाण, उपसरपंच लक्ष्‍मण वाघमारे, ग्राम. सदस्य बाबुराव जाधव, सचिन यादव, वसंत पाटील, मा. सरपंच महादेव पवार, अशोक पाटील, अंकुश पाटील, शिक्षक नेते धोंडीराम पाटील, उत्तम जोंधळे, युवा नेते नितीन पाटील, सुभाष कोकरे, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, बाळासो वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, दत्तात्रय आलदर, महेश वाघमारे, शरद गुरव, दासू गुरव, सुरेश पवार, सुरेश रेड्डी, प्रशांत कदम, प्रशांत पाटील, दत्तात्रय वाघमारे, काका वाघमारे, नितीन वाघमारे, संभाजी शिंदे, बापू पवार, कार्तिक पवार, नरसिंह निंबाळकर, ग्रामसेविका मेघा हिप्परकर, पत्रकार रविराज शेटे, पालक निलेश जाधव, सौ. पल्लवी जाधव, सौ. वर्षा पवार, आर्. एन. जाधव, शुभम कुडचे, संस्कार पवार, संजय यादवाडे, सुरेश पवार, ग्रामस्थ, युवावर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आबा पवार यांनी तर आभार माजी प्राचार्य के. वाय. पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत