संत कवी श्रीधर स्वामी पुण्यतिथी निमित्त नाझरे येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न....! पुरस्कारामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळते.. केंद्रप्रमुख मोहन जुंदळे
नाझरे प्रतिनिधी
संत कवी श्रीधर स्वामी देवस्थान ट्रस्टतर्फे नाझरे ता. सांगोला येथे सोळा प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. व शेतकऱ्यांचा सन्मान करणे ही संकल्पना जनता काय यांना सुचली व पुरस्कारामुळे शेतकऱ्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळाली असे मत केंद्रप्रमुख मोहन जुंदळे यांनी पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते अशोक पाटील हे होते.
सदर प्रसंगी पुरस्कार देण्याचा हेतू शिक्षक नेते अशोक पाटील यांनी सांगितला व संजय सरगर, भाऊ पाटील, मनोज पाटील, राजेंद्र बंडगर, वसंत चौगुले इत्यादी शेतकऱ्यांनी व रमेश काका यांनी शेतकऱ्याचा प्रथम सत्कार होत आहे व त्यामुळे भारावून गेलो असे सांगितले. यावेळी प्रगतशील डाळिंब बागायतदार वसंत रामगोंडा चौगुले, राजेंद्र बंडगर, महेश चौगुले, संजय सरगर, आनंदा लिंगे, वसंत रामचंद्र चौगुले, मनोज पाटील, प्रतापसिंह वराडे, अरुण पाटील, बाळासाहेब बंडगर, विजय घोडके, संतोष पाटील, अल्लम प्रभू पाटील, प्रवीण पाटील, बंडू बनसोडे, बाळासो चौगुले इ. शेतकऱ्यांना गौरवण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. विजय सरगर, सामाजिक कार्यकर्ते अप्पू राज् आदाटे, शिक्षक दुर्योधन आलदर, दामोदर आलदर, दामोदर आलदर, नितीन टिंगरे, सुभाष काका, राजू मामा, माता निर्मला देशपांडे, नागेश महाराज, उमेश पाटील, ओंकार देशपांडे, शेतकरी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रविराज शेटे यांनी तर आभार विनोद देशपांडे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत