सांगोला विकास आघाडीचे चोपडी गटाचे, गणाचे उमेदवार विजयी करा..- आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख..! चोपडी गटातील मतदार स्वाभिमानी त्यामुळे सांगोला विकास आघाडीचाच विजय निश्चित.. -मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील*
नाझरे प्रतिनिधी
स्वर्गीय आबासाहेबांनी 50 ते 60 वर्षात जातीपातीचे राजकारण केले नाही व फुले आंबेडकरांचा विचार जपला व तोच वारसा सांगोला विकासासाठी जपत असून चोपडी गटाचे विजयदादा शिंदे, गणाचे अनिल जगदाळे व राजुरी गणाचे उमेदवार समाधान रुपनर यांनाच विजयी करा व स्वर्गीय आबासाहेबांना वसंत अण्णांनी साथ दिली तशीच साथ तुम्ही मतदारांनी द्या व नारळ, तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह पाहून बटन दाबा असे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी नाझरे ता. सांगोला प्रचार सभेत मत व्यक्त केले.
सुरुवातीस युवा नेते अजिंक्य शिंदे, दादासो हरिअर, सतीश जी काटे, बाळासो शिंदे, सुनील चौगुले यांनीही सांगोला विकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले. तर पैशाच्या जोरावर बाहेरचा उमेदवार चोपडी गटात दिला व त्यामुळे गावगाड्यातील पुढारी संपत चालला व यासाठी हुकूमशाही दडपशाही संपवण्यासाठी मला शेवटची सेवा करण्याची संधी द्या व विजयी करा असे मत चोपडी गटाचे उमेदवार विजय दादा शिंदे यांनी यावेळी मत व्यक्त केले. गणाचे उमेदवार अनिल जगदाळे व समाधान रुपनर यांनीही विजयी करण्याचे आवाहन केले.
या अगोदर या गटात डीपी, मुरूम दिला नाही व आता निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार देत आहेत म्हणजे पैसा व सत्ता आहे म्हणजे सर्व काही आलबेल आहे असे नाही व येथील जनता स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. व सर्वांनी रात्र वैऱ्याची आहे गहाळ राहू नका व दक्ष राहून मतदान करा. उमेदवार विजय दादा ने कळप बदलला त्यामुळे गुलाल लागणारच असे मत मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. सदर प्रसंगी शेकापचिटणीस दादा शेठ बाबर, ज्येष्ठ नेते महालिंग आप्पा राय चुरे, मा. सरपंच हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, पिंटू बंडगर, उत्तम पाटील, संजय सरगर, विजय बंडगर, राजू बंडगर, गोपाळशेठ सरगर, बलवडी चे सरपंच माऊली राऊत, उपसरपंच शिवाजी शिंदे, मधुकर ढोबळे, समाधान शिंदे, रविराज शिंदे, रमेश शिंदे, शिवाजी सरगर, प्रा. विजय गोडसे, रमेश शिंदे, सोसा. चेअरमन शिवाजी शिंदे, शशिकांत पाटील, नवनाथ बनसोडे, अप्पू राजा, अदाटे, बसवेश्वर आदाटे, पांडुरंग वाघमारे, बंडू मामा आदाटे, सुशांत आईवळे, समीर मुलानी, रफिक काजी, योगेश देवकुळे, बाळासो वाघमारे, संजय करडे, राजू अडसूळ, सुनील अडसूळ, बाळासो चौगुले, मदन रायचुरे, चंद्रकांत बंडगर, तात्या सो बंडगर, रमेश वाघमारे, नवनाथ बंडगर, राजू खोकले, वस्ताद बंडगर, महेश चौगुले, मधु आलदर, महेश चौगुले, एडवोकेट सत्यजित लिगाडे, अमर बापु लिगाडे, सुरेंद्र ढोबळे, दुर्योधन आलदर, शिवभूषण ढोबळे, विकास जावीर, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी अरुण अण्णा बनसोडे, शहाजी माने, मा. सरपंच प्रसाद शिंदे, ग्रामस्थ, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मा. उपसरपंच सुनील बनसोडे यांनी तर आभार मा. उपसरपंच नागेश रायचुरे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत