Breaking News

सिस्टिमॅटिक ओटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन (SVEEP)


सांगोला प्रतिनिधी:-    

        जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पंचायत समिती अंतर्गत उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी व अभिजीत मोलाने बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगोला नोडल अधिकारी स्वीप यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 02/02/2026 रोजी आयसीडीएस यांचे मार्फत सांगोला, वाढेगाव, मेडशिंगी व बामणी येथे मतदान जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. या मोहिमेत अंगणवाडीतील सेविका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या लोकजागृतीसाठी त्यांनी रांगोळी, बॅनर, पोस्टरद्वारे मतदानाचे महत्त्व जनतेस पटवून दिले प्रत्येकाचे मत हे महत्त्वाचे असून निर्भय व मुक्त मतदान करा लोकशाही बळकट करा अशा घोषणा देऊन फलकाद्वारे ,घोषवाक्य द्वारे मतदारांची जागृती करण्यात आली या रॅली साठी मार्गदर्शक अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा वाघमारे मॅडम, राजश्री जंबेनाळ, पल्लवी चंदनशिवे, अर्चना सांगोलकर, माधुरी वाघमारे, सरस्वती जाधव यांनी भाग घेतला असून सांगोला प्रकल्प व कोळा प्रकल्प यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला  सरस्वती जाधव यांनी रांगोळीतून मेडशिंगी येथे जनजागृती केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे

         या उपक्रमाचे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी व्यक्त केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत