Breaking News

क्रांतीज्योती महिला नागरी सह. पतसंस्था नाझरे शाखेत तिळगुळाच्या गोडव्याने नाते फुलवणारा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न...


नाझरे प्रतिनिधी 

       तिळगुळ घ्या,.. गोड गोड बोला... या पारंपारिक संदेशाने नाती अधिक घट्ट करणारा मकर संक्रांतीचा सण म्हणजे तिळगुळाच्या गोडव्याने नाते फुलवणारा सणाचा गोडवा जपत क्रांतीज्योती महिला नागरी सह. पतसंस्था नाझरे ता. सांगोला या शाखेत चेअरमन सौ. भाग्यश्री बनकर यांच्या शुभहस्ते महिलांना अल्पोपहार, तिळगुळ व भेटवस्तू वाटप करण्यात आली. 

     सुरुवातीस लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सल्लागार नयना पाटील, कर्मचारी शिवानी फुले, चेअरमन सौ. भाग्यश्री बनकर यांनी तिळगुळाचे महत्त्व सांगितले. यावेळी सल्लागार सौ. चंद्रकला बाबर, सौ . इंदुमती वाघमारे, कर्मचारी जयश्री अडसूळ, वैजनाथ अडसूळ, सचिन स्वामी, अमोल स्वामी, सोमनाथ मिसाळ, तुकाराम बनसोडे, लक्ष्मण ढोबळे, गणेश भद्रे व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी सर्वांचे आभार जयश्री अडसूळ यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत