Breaking News

सांगोल्यातून जिल्हा परिषद गटातून. 141 पंचायत समिती गणातून 197 नामनिर्देशन पत्र दाखल


 सांगोला प्रतिनिधी :-

       सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील आज शेवटच्या दिवशी दिनांक 21 जानेवारी2026 अखेर 722 अर्जाची विक्रमी विक्री झाली आहे तर जिल्हा परिषद गट 141 व पंचायत समिती गणातून एकूण 197 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  बाळूताई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी सांगितले आहे.    

     आज दाखल झालेल्या  अर्जापैकी जिल्हा परिषद गटातून एकूण 141 अर्जांचे नामनिर्देशन झाले आहे तसेच पंचायत समिती गणातून एकूण 197 नामनिर्देशनपत्र दाखल झाले असून एकूण 338 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत त्यापैकी  जि प महुद गट 16,  एकतपुर गट 13 , जवळा गट 28, कडलास गट 26, चोपडी गट 28,  कोळागट 16, घेरडी गट 14 दाखल झाले आहेत जिल्हा परिषद गटातून एकूण 141 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत तसेच पंचायत समिती गणातून महुत बुद्रुक 10, चिकमहुद 17,वाकी शिवणे10, एकतपुर 11, वाढेगाव 10,जवळा 15 कडलास 23  अजनाळे 13, राजुरी 13, चोपडी 21, कोळा 7, हातीद 12, सोनंद 11,घेरडी  24,   पंचायत समिती गणातून एकूण 197  नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी माहिती दिली या कामी कडेकोट पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब व एपीआय पवन मोरे साहेब यांनी दिल्याची माहीती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत