माणगंगा अर्बन को. ऑप. सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर.. संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले
सांगोला प्रतिनिधी
सभासदांच्या सहकार्याने, पाठिंब्याने 26 जानेवारी 2021 रोजी माणगंगा अर्बन क्रेडिट सोसायटी ची सुरुवात झाली व आज 65 हजार कोटीच्या ठेवी व 130 कोटीची उलाढाल होत आहे व त्यामुळे सुरुवातीस लावलेले हे छोटे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झाले व नाझरे ता. सांगोला येथे नूतन शाखेचे उद्घाटन होत असल्यामुळे सभासदात, शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आबासाहेब इंगोले यांनी उद्घाटन प्रसंगी नाजरे शाखेत मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव ढोबळे हे होते.
संस्थेचे नुसते ठेवी स्वीकारणे हे ध्येय नसून, छोट्या, मोठ्या उद्योगांना, शेतकऱ्यांना मदत करणे हा हेतू असून, संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम यामध्ये आरोग्य शिबिर, गुणवंत व आदर्श शिक्षकांचा सत्कार इ. राबविले जात आहेत, व मानगंगा परिवार डौलत आहे याचा अभिमान आम्हास व तुम्हा सर्वांस आहे असेही यावेळी नितीन आबा इंगोले यांनी सांगितले. सुरुवातीस प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन तसेच शाखेचे उद्घाटन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेचे संस्थापक नितीन इंगोले यांची सांगोला नगरपालिकेच्या नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी नाझरे येथील सातवी शाखा असल्याचे मा. उपसभापती सुनील चौगुले यांनी सांगितले. तर नितीन आबा इंगोले एक अभ्यासून नेतृत्व असल्याने ही संस्था विश्वासास पात्र ठरेल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी सरपंच डॉ. विजय सरगर, मा. सरपंच शामराव वाघमारे, संजय सरगर, मार्केट कमिटी संचालक सूर्यकांत आधाटे, मा. उपसरपंच सौ. सुमित्रा लोहार, विजय गोडसे, लक्ष्मण वाघमारे, मा. चेअरमन चंद्रकांत बंडगर, उद्योजक दत्तात्रय बंडगर, सुधीर सरगर, डॉ. नामदेव देशमुख, पत्रकार रविराज शेटे, मुंबई पोलीस अविनाश इंगोले, संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले, उप चेअरमन सुखदेव रंधवे, संचालक सचिन इंगोले, विजय वाघमोडे, अण्णासो केदार, हनुमंत भंडारे, महादेव शिंदे, डोंगरे, सीईओ अक्षय मुढे, शाखाधिकारी प्रशांत होवाळ, कर्मचारी सागर खरात, सिद्धेश्वर आवताडे, संचालक, सभासद, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संचालक विवेक घाडगे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत