Breaking News

संविधान जनजागृती उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


मंगळवेढा प्रतिनिधी

ग्रामपंचायत माचनूर येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख, त्यातील मूल्ये व नागरिकांचे मूलभूत हक्क यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या आदरणीय सरपंच दिपाली कलुबर्मे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका, ग्रामस्थ शिवशरण ताई, ग्रामपंचायत अधिकारी माने मॅडम तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कांबळे, सलीम शेख, अभिजीत सरवळे, बबलू डोके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून संविधानाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वक्त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे शाळा व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा जनजागृती उपक्रम यशस्वी ठरला.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत