17 डिसेंबर रोजी पेन्शनर डे साजरा करणार.. - अध्यक्ष वसंतराव दिघे
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सांगोला तालुका पेन्शनर संघटनेचे ऑफिसमध्ये पेन्शनर डे साजरा करण्यात येणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले, पुणे विभागीय अध्यक्ष सिद्धेश्वर धसाडे, सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील, सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ इ. मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संघटनेचे सल्लागार शंकर सावंत यांनी सांगितले. तरी सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक दिनकर घोडके व एकनाथ जावीर यांनी केले आहे. तसेच सर्व सेवानिवृत्तांनी आपले हयातीचे फार्म भरून 21 डिसेंबर अखेर पंचायत समिती सांगोला येथे भरून द्यावेत असे आवाहन संघटनेचे सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत