सांगोला तालुक्यात 60 तलाठी व 10 मंडल अधिकाऱ्याचा कामावर बहिष्कार.. .! तहसीलदारांना निवेदन सादर... कामकाज ठप्प..
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील बहुसंख्य ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी यांच्याकडे सन 2016 ते 2019 या कालावधीत लॅपटॉप व प्रिंटर आहेत व ते कालबाह्य झाले आहेत व हे कालबाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटर बदलून नवीन यंत्रणा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात या प्रमुख मागणीसाठी सांगोला तालुक्यातील 60 तलाठी व दहा मंडळाधिकारी यांनी ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकला असून, त्यामुळे महसूल विभागाचे संपूर्ण ऑनलाइन कामकाज व इतर कामकाज ही ठप्प झाले आहे.
नादुरुस्त व कालबाह्य साधने कुचकामी ठरत असून, याचा परिणाम ई.. फेरफार..ई.. पीकपाहणी, सातबारा उतारे, ई.. चावडी, खाते उतारा यासारख्या ऑनलाईन सेवेमध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत व नव्याने भरती झालेल्या अधिकाऱ्यांनाही अद्याप नवीन संगणकीय साधने उपलब्ध करून देण्यात आले नाहीत व याचा जुन्या व नव्या अधिकाऱ्यांना कामकाज करताना वारंवार अडचणी येत आहेत व याचा फटका नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना ही बसत आहे व यामुळे सांगोला तालुक्यासह जिल्हाभर हे आंदोलन सुरू आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कर्मचारी वर्गामध्ये तीव्र असंतोष व मानसिक आरोग्यावर परिणाम
कालबाह्य व नादुरुस्त उपकरणावर काम करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना अक्षरशः गंजलेल्या तलवारीने लढाई लढण्यास लावणे होय व प्रचंड कामकाजाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव, असंतोष, व शासनाबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे व नवीन भरतीत आलेले सुमारे 3000 अधिकाऱ्यांना ही संगणकीय साधने उपलब्ध नाहीत व याचा क्षेत्रीय कामकाजावर परिणाम होत आहे.
हरिश्चंद्र जाधव अध्यक्ष सांगोला सांगोला तालुका तलाठी संघ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्या नाहीत